16.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeराष्ट्रीयकोल्हापूरच्या कृष्णा खोत यांच्या रिंगणला साहित्य अकादमी पुरस्कार

कोल्हापूरच्या कृष्णा खोत यांच्या रिंगणला साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली : यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार बुधवार, दि. २० डिसेंबर २०२३ रोजी कोल्हापुरातील कृष्णात खोत यांच्या रिंगण या कांदबरीला जाहीर करण्यात आला आहे. देशातील २४ भाषेत प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर केला जातो. यामध्ये मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार रिंगण या कादंबरीला मिळाला आहे. साहित्य क्षेत्रात साहित्य अकादमी पुरस्कार हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या पुरस्काराचे वितरण १२ मार्च २०२४ रोजी करण्यात येणार आहे.
कृष्णात खोत हे रिंगण या कादंबरीचे लेखक आहेत. त्यांनी त्यांच्या या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचे चित्रण केले आहे. दरम्यान साहित्य क्षेत्रातील साहित्य अकादमी पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. त्याच पुरस्कारने कृष्णात खोत यांना त्यांच्या रिंगण या कादंबरीसाठी गौरविण्यात येणार आहे.
साहित्य आणि भाषा क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. हे भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण साहित्यिक वारसाचे संवर्धन आणि जतन करते. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते. साहित्य अकादमी पुरस्कार भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या २४ भाषांना दिला जातो. उर्दू, हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त यात आसामी, बंगाली, डोगरी, कन्नड, मराठी आणि मल्याळम या प्रादेशिक भाषांचा समावेश आहे. या भाषांमधील उत्कृष्ट साहित्याला या पुरस्काराने गौरविले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR