22.6 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeलातूरक्रांतीकारी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीस पाठिंबा

क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीस पाठिंबा

लातूर : प्रतिनिधी
शेतकरी नेते रविकांत तूपकर यांच्या क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस महाविकास आघाडीला दि. १२ नोव्हेंबर रोजी पाठींबा देण्यात आला. लातूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सहाही उमेदवारांच्या विजयासाठी क्रांतीकारी शेतकरी संघटना नेटाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
येथील आशियाना निवासस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी, राजू दळवे, नवनाथ शिंदे, दत्ता किनीकर, लक्ष्मण कांबळे, मारुती कसबे, प्रज्योत हुडे, अमर हैबतपूर यांनी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा पाठींबा महाविकास आघाडीला दिल्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना सत्तार पटेल म्हणाले, गेल्या दहा वर्षांत सरकारने शेतक-यांच्याबाबतीत घेतलेले सर्व निर्णय शेतक-यांच्याच मुळावर उठले आहेत. दीडपट हमी भाव दिला नाही. उत्पन्न दुप्पट करतो, असे सांगीतले परंतू, उत्पादन खर्चच चारपट करुन ठेवला. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी उद्धवस्त होत असताना सरकारच उघड्या डोळ्याने पाहात असेल तर ते आम्ही कदापिही सहन करणार नाही. त्यामुळेच आम्ही महाविकास आघाडीला पाठींबा दिला आहे.
राजेंद्र मोरे म्हणाले, विमा कंपनी आणि सरकारचे साटेलोटे आहे. त्यामुळे विम्याच्या बाबतीत सरकारने गांभीर्याने घेतले नाही. शेतक-यांचे प्रश्न, आडीअडचणी सोडविण्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा नेहमी पुढाकार असतो. त्यामुळेच आम्ही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा पाठींबा महाविकास आघाडीला दिला आहे. जिल्ह्यातील महविकास आघाडीच्या सहाही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत.  यावेळी साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, काँग्रेस मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR