17.6 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्रखबरदार शेतक-यांना सिबिल विचाराल तर : फडणवीस

खबरदार शेतक-यांना सिबिल विचाराल तर : फडणवीस

शेतक-यांना कर्ज नाकारणा-या बँकांवर गुन्हे दाखल होणार उपमुख्यमंत्र्यांचा बँकांना इशारा

मुंबई : शेतक-यांना सिबिलची अट लागू करू नये. तसेच सीबीलचे कारण दाखवून बँकांनी कर्ज नाकारले तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतक-यांना सिबिलची अट लागू करु नये. तसेच सिबिलचे कारण दाखवून त्यांना बँकांनी जर कर्ज नाकारले तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सिबिलचे कारण सांगून बँकांनी कर्ज नाकारले तर त्यांच्यावर एफआयआर दाखल करु असा इशाराही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला. एफआयआर दाखल केल्यावर आमच्याकडे येऊ नका असेही फडणवीस म्हणाले.

कोणत्याही बँकांना शेतक-याला कर्ज नाकारता येणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. सिबिलचे कारण सांगून शेतक-यांना कर्ज नाकारु नये असेही ते म्हणाले. तसे जर झाले तर एफआयआर दाखल करण्याचा इशारा फडणवीसांनी दिला आहे. याबाबतची माहिती सर्व बँकांना द्यावी असेही ते म्हणाले. दरम्यान, शेतक-यांना कर्ज मिळताना येणा-या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही फडणवीस म्हणाले. खरीप पूर्व बैठकीत बियाणे खतांची उपलब्धता याबाबतची चर्चा झाली आहे. शेतक-यांना पिक विमा मिळाला पाहिजे, याबाबातचा आढावा आजच्या बैठकीत आम्ही घेतला. खरीपाच्या हंगामात शेतक-यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

नॅनो खतांचा वापर वाढला पाहिजे
डीपीए खतांचा वापर कमी झाला पाहिजे आणि नॅनो खतांचा वापर वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, जास्तीत जास्त शेतक-यांना पिक विमा मिळाला पाहिजे असेही फडणवीस म्हणाले. तसेच रासायनिक खतांचे लिंकिंग करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पेरणीच्या कामांना वेग
राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. या खरीपाच्या पेरणीत शेतक-यांना बी बियाणे खते यांचा अपेक्षीत प्रमाणात पुरवठा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, ज्या ठिकाणी चांगला झाला आहे, त्या ठिकाणी पेरणीच्या कामांना वेग आला. तर ज्या ठिकाणी चांगला पाऊस नाही, त्या ठिकाणचे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३० जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR