लातूर : प्रतिनिधी
सर्वसामान्यांचा गावरान मेवा म्हणून ओळख असलेल्या सीताफळांची बाजारात गेल्या काही दिवसापासून आवक वाढली आहे. बाजारात विक्रीसाठी ठिकठिकाणी गावरान सिताफळ दाखल झाली आहेत. विजयादशमी संपताच सीताफळांची मोइ्या प्रमाणात आवक बाजारात सुरू आहे. सध्या शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्त्याच्या कडेला विविध ठिकाणी मोठया प्रमाणात विक्रीते बसलेले दिसून येत आहेत.
हंगामी व पौष्टिक फळ म्हणून आवडीने सीताफळ खाल्ले जाते. त्यामुळे ग्राहकांनी सीताफळांना विशेष मागणी असल्याची फळ विक्रीत्यांचे म्हणणे आहे. दस-याच्या दरम्यान सीताफळ बाजारात येतात. परंतु यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे गरिबांना ग्रामीण सुकामेवा म्हणून ओळख असलेल्या सीताफळांची आवक गेल्या महिनाभरापासून बाजारात सुरू झाली आहे. सध्या बाजारात सीताफळासाठी ३० ते ४० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन कमी खर्चात पुरेसे उत्पादन देणारे फळ म्हणून सीताफळ ओळखले जाते. सीताफळाचा हंगाम जून ते जानेवारीदरम्यान तीन बहरात असतो. जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, अंतिम बहार हा जानेवारी आणि फेब्रुवारीचा असतो. जून ते ऑक्टोबरचा बहर बाजारात आला आहे. सध्या बाजारात सध्या चांगल्या प्रमाणात सीताफळ येत आहेत, शिवाय त्यांचे दरही आवाक्यात असल्याने ग्राहकांना मोठया प्रमाणात त्यांचा आस्वाद घेता येत आहे.
शहरातील फु्रट बाजारात सध्या सीताफळाची जवळपास २० ते ३० क्ंिव्टल आवक होत आहे. हे सीताफळ ग्रामीण भागासह शेजारील जिल्ह्यातून आवक येत आहे. गतवर्षाच्या तूलनेत यंदा सीताफळाची आवक काहीशी उशिराने सुरू झाली आहे. मात्र, आता आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. यापुढेही ही आवक अशीच वाढत राहणार असल्याचे व्यापा-यांकडून सांगितले जात आहे.
आवक समाधानकारक असल्याने सीताफळाचे दरही आवाक्यात राहणार असल्याचे किरकोळ व्यापा-यांनी सांगितले. सध्या घाऊक बाजारात उच्च प्रतीचे सीताफळ ५० रुपये किलो दराने विकले जात आहेत. तर त्या खालोखाल असणारे सीताफळ ३० ते ४० रुपये किलोने मिळत आहेत. दर नियंत्रणात असल्याने ग्राहकांचीही त्यांना विशेष मागणी असल्याचे व्यापा-याचे म्हणणे आहे. किरकोळ बाजारातही उच्च प्रतीचे सीताफळ ५० रुपये किलो, तर त्या खालोखाल असणारे सीताफळ ३० ते ४० रुपये किलो दराने मिळत आहेत.