उदगीर : प्रतिनिधी
येथील रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने दि २० ऑक्टोबर रोजी पहिले राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलन राज्यभरातील पत्रकार, साहित्यिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते धुळे येथील संपादक गो. पी. लांडगे यांना जीवनगौरव तर ‘एकमत’चे संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर, दीपक कैतके मुंबई, रवी उबाळे, बिड, विकास देशमुख, छत्रपती संभाजीनगर, बाबासाहेब परीट सांगली, जान्हवी पाटील रत्नागीरी यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सकाच्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते संमेलन स्थळ रघुकुल मंगल कार्यालय संविधान दिंडी काढण्यात आली. यानंतर उदघाटन सोहळा मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते पार पडला. संमेलनाचे समारोप सत्र व पुरस्कर वितरण सोहळा संयुक्त राष्ट्रसंघ प्रेस फोटोग्राफर अभिजीत गुर्जर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख पाहूणे म्हणून एम. एम. देशमुख, डॉ. रविंद्र चिंचोलकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार सुधाकर भालेराव, शिवराज काटकर, साागर महाजन, युवराज धोतरे यांची उपस्थिती होती.
यावेळी धुळे येथील संपादक गो. पी. लांडगे यांना जीवनगौरव तर ‘एकमत’चे संपादक मंगेश देशपांडे-डोंगराजकर, दीपक कैतके मुंबई, रवी उबाळे, बिड, विकास देशमुख, छत्रपती संभाजीनगर, बाबासाहेब परीट सांगली, जान्हवी पाटील रत्नागीरी यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रा. बिभीषन मद्देवाड, सचिन शिवशेट्टे, श्रीनिवास सोनी, सुनिल हावा पाटील, अर्जुन जाधव, सिध्दार्थ सुर्यवंशी, नागनाथ गुट्टे, विनोद उग्गिले यांनी यांच्यासह उदगीरमधील पत्रकारांनी सहकार्य केले.