14.7 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeलातूरगोलाईतील भाजीपाला विक्रेते गेले कुठे?

गोलाईतील भाजीपाला विक्रेते गेले कुठे?

लातूर : प्रतिनिधी
शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईतील सर्कल व सर्कलबाहेरील भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते हातागाडीवाल्यांना अतिक्र्रमणाच्या नावाखाली गंजगोलाईतून काढून त्यांचे गंजगोलाईच्या परिसरातीलच नवयुग सिनेमा थिएटरच्या समोरच्या लातूर शहर महानगरपालिकेच्या दोन प्लॉटवर दि. २३ डिसेंबर रोजी पुनर्वसन करण्यात आले. परंतु, गेल्या १२ दिवसांत भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी पुनर्वसीत  जागेवर व्यवसाय केलाच नाही. उलट पुनर्वसीत जागेवर हातगाडे ठेवुन तिथल्याही जागेवर कब्जा झाल्याचे सध्याचे चित्र आहे.
सोळा रस्त्यांनी जोडलेल्या गंजगोलाईत  प्रत्येक रस्त्यावर वैशिष्टयेपूर्ण व्यवसाय चालतात. जसे की, भूसार लाईन, कापड लाईन, सराफ लाईन. एवढेच नव्हे तर गंजगोलाईच्या सर्कलमध्ये आणि सर्कलच्या बाहेरही विविध छोटे-मोठे व्यवसाय चालतात. त्यात भाजीपाला, फळे, क्रॉकरी, हळद-कुंकु, झाडु-फळे, चप्पल, बुट शिवणारे, कुलूपवाले, बांंगडीवाले, वडापाव, समोसा, खिचडी, राईसवाले आदी अनेक व्यवसाय चालतात. गंजगोलाई मुख्य बाजारपेठ असल्यामुळे गंजगोलाईत दररोज प्रचंड गर्दी होते. दुचाकी, चारचाकी वाहने, ऑटोरिक्षांचीही मोठी वर्दळ असते. विविध सण, उत्सवाच्या काळात तर गंजगोलाईत पायी चालणेही शक्य होत नाही. एवढी गर्दी असते.  गंजगोलाईतील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने लातूर शहर महानगरपालिका व लातूर शहर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने गंजगोलाईतील भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेत्यांसह सर्वच छोट्या व्यवसायिकांना गंजगोलाईतून काढून नवयुग सिनेमा थिएटरच्या परिसरातील दोन प्लॉटवर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले.
हे पुनर्वसन होताना भाजीपाला, फळे विक्रेत्यांसह इतरही व्यवसायिकांनी पुनर्वसनाच्या प्लॉटकर जुने हातगाडे, छोट्या टप-या ठेवून जागा पकडली. दि. २३ डिसेंबर रोजी पूनर्वसीत प्लॉटवरील जागा पकडताना व्यवसायिकांमध्ये स्वर्धाच लागली होती. त्यामुळे धक्काबुक्की, बाचाबाची झाली. काहींनी मनपा अधिका-यांसोबत वादही घातला. व्यवसायिकांनी जुने, जीर्ण हातगाडे पूनर्वसीत प्लॉटवर आणुन ठेवत त्या जागेवर कब्जा केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR