परभणी : महाष्ट्रातील गुन्हेगारी जी वाढत आहे ती घुसखोर बांगलादेशीमुळे होत आहे. हे काही दिवसाखाली झालेल्या अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्यावरून निदर्शनास येते. त्याचप्रमाणे परभणीतही बांगलादेशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील घुसखोर बांगलादेशींचा शोध घेवून कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, परभणी शहरालगत ब-याच वस्त्या आहेत जेथे काही घुसखोर बांगलादेशी लोक बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन ब-याच दिवसांपासून वास्तव्य करत आहेत. ते गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांच्यापासून परभणीकरांना हानी होऊ शकते. स्थानिक पोलिसांनी सदर ठिकाणी तपासणी मोहीम हाती घेऊन सर्वांचे कागदपत्रे योग्य आहेत का हे पाहावे व घुसखोरांवर कायदेशीर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी जिल्हाधिकारी गावडे यांच्याकडे केली आहे.
यावेळी शिवसेना नेते आनंद भरोसे, भास्कर लंगोटे, माणिक पोंढे, बाळासाहेब पानपट्टे, प्रवीण गायकवाड आदिसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.