चाकूर : प्रतिनिधी
चाकूर तालूक्यात दोन दिवसाच्या पावसाने खरीप हंगामाचे नुकसान झाले असुन साठवण आणि लघू मध्यम प्रकल्प भरल्याने दिलासा मिळाला आहे. तसेच पाण्यांचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. तालूक्यातील बोथी, राचन्नावाडी,संगमवाडी येथील तसेच इतरही साठवण आणि लघू मध्यम प्रकल्प भरले आहेत. या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे ओढे,नाले,नद्या भरून वाहील्याने नदी काठच्या शेतीचे तसेच खरीप हंगामातील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.तसेच सखल भागातील शेतीला तळ्याचे स्वरूप आल्याने सोयाबीन पाण्यांत गेले आहे. तसेच मुग,उडीद,फळबागेचे,टमाटे याचेही नुकसान झाले आहे. उदगीर-लातूर मार्गाला बसला असुन नळेगाव जवळील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक थांबली आहे. ही वाहतूक चाकूर मार्गे वळविण्यात आली आहे.
दि २ सप्टेबंर रोजीचे चाकूर तालूक्यात मंडळनिहाय पर्जन्यमान -चाकूर ७३ मिमी (७४१), झरी बु-७१ मिमी (७२३), शेळगांव १२९ मिमी(७४३), नळेगाव ७२ मिमी(६४३), आष्टा ७२ मिमी (६२७),वडवळ ७६ मिमी (८९५),एकूण पर्जन्य- ४९३ मिमी,सरासरी पर्जन्य – ८३.१६ मिमी,एकूण पर्जन्यमान-४३८५ मिमी,एकूण सरासरी पर्जन्यमान -७३०.८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालूक्यातील खरीप हंगामातील नुकसानीचे त्वरीत पंचनामे करावेत, अशी मागणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे तसेच फोनद्वारेही त्वरीत पंचनामे करण्यांची मागणी केली आहे.