23 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्रचार हजार हेक्टरवरील मिरची धोक्यात

चार हजार हेक्टरवरील मिरची धोक्यात

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मिरची पिकाने यंदा सिल्लोड तालुक्यातील शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. उन्हाळी मिरचीवर कोकडा, मावा व व्हायरस आल्याने जवळपास २ हजार हेक्टरवरील मिरचीची रोपटे शेतक-यांनी उपटून फेकली असून सुमारे ३ ते ४ हजार हेक्टर क्षेत्र या व्हायरसमुळे धोक्यात सापडले आहे. यात शेतक-यांचे सुमारे हजार ते बाराशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, मागील वर्षी सिल्लोड तालुक्यात ५ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मिरचीची लागवड झाली होती. त्यातून जवळपास ९०० कोटी रुपयांची उलाढाल होऊन अनेक शेतकरी मालामाल झाले होते. यामुळे यावर्षी मिरचीचे क्षेत्र वाढून ६ हजार ८०० हेक्टरपर्यंत पोहोचले, भावपण १० ते १२ हजार रुपये क्विंटल मिळत आहे. मात्र, व्हायरस आल्याने उत्पादन कमालीचे घटले आहे.

तालुक्यात केवळ शासकीय दप्तरी नोंदणीकृत ३ नर्सरी आहेत. मात्र, १० ते १२ अवैध नर्सरी असून त्यांची कुठेच नोंद नाही. या नर्सरी चालकांनी निकृष्ट मिरचीची रोपे तयार करून काही शेतक-यांची फसवणूक केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR