22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeअंतरराष्ट्रीयचीनचे तैवानला युद्धासाठी आव्हान; १५३ फायटर जेट विमाने तैनात

चीनचे तैवानला युद्धासाठी आव्हान; १५३ फायटर जेट विमाने तैनात

 

बीजिंग : वृत्तसंस्था
चीनी सैन्याने तैवानला समुद्राच्या चारही दिशेनं घेरलं आहे. तैवानला घाबरवण्यासाठी चीनी सैन्याकडून युद्धसराव केला जात आहे. त्यात १५३ हून अधिक फायटर विमाने उडवण्यात आली. चीनी लष्कराने फायटर जेट, ड्रोन, युद्धनौका आणि कोस्ट गार्डच्या नौकांच्या मदतीने युद्ध सराव केला अशी माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

तैवानने चीनच्या या कृतीचा तीव्र निषेध केला असून हे विनाकारण चिथावणी देणारे कृत्य असल्याचे म्हटले आहे. चीनच्या कोणत्याही गैरप्रकाराला तोंड देण्यासाठी जहाजविरोधी क्षेपणास्त्रेही तैनात करत तैवानने आपल्या सैन्याला सतर्क केले.

तैवानने सांगितले की, २५ तासांत तैवानभोवती १५३ लढाऊ विमाने पाहण्यात आली. यापैकी १११ लढाऊ विमानांनी मेडिअन सीमा ओलांडली. चीन या सीमारेषेला मानत नाही. चीनने युद्धासाठी तयार असल्याची शपथ घेतली आहे. चीनच्या या हालचालीमुळे तैवानच्या जलडमरुमध्य इथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. तैवानचे राष्ट्रपती लाइ च्ािंग-ते यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत तैवानने स्वत:ला चीनचा भाग म्हणून स्वीकारावे या बीजिंगच्या मागणीला मान्यता देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, तैवानच्या राष्ट्रपती कार्यालयाने चीनला प्रादेशिक शांतता आणि स्थिरता बिघडवणारी लष्करी चिथावणी थांबवावी आणि तैवानच्या लोकशाही आणि स्वातंत्र्याला आव्हान देणे थांबवावे असा इशारा दिला आहे. चीनने युद्धसरावावेळी विमानवाहू नौका देखील तैनात केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR