20 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीयचीनने ८ वर्षांत डोकलाम सीमेलगत वसवली २२ गावे

चीनने ८ वर्षांत डोकलाम सीमेलगत वसवली २२ गावे

 

बीजिंग : वृत्तसंस्था
चीनने गेल्या ८ वर्षांत भूतान सीमेलगत २२ गावे वसवली आहेत. उपग्रह छायाचित्रांतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. भूतानच्या पश्चिमेकडील भागात डोकलाम सीमेलगत भारताला लागून यापैकी ८ गावे आहेत. ही सर्व ८ गावे २०२० नंतर वसविण्यात आली आहेत.

ही गावे ज्या ठिकाणांवर आहेत, त्या जागांवर चीन आपल्या ‘वन चायना’ मोहिमेअंतर्गत नेहमीच दावा सांगत आलेला आहे. गावांना लागूनच चिनी सैन्याच्या चौक्या आहेत. जीऊ हे २२ गावांपैकी सर्वात मोठे गाव आहे. त्सेथंखखा या भूतानच्या मालकीच्या भागात ते वसलेले आहे. चीनने या गावांमध्ये लष्करातील अधिकारी, कर्मचारी मजूर, बॉर्डर पोलिस दलातील कर्मचा-यांना वसविलेले आहे. ही सर्व गावे चीनच्या शहरांशी रस्त्यांच्या मार्गाने जोडलेली आहेत. भूतान मात्र याबाबत मूग गिळून गप्प आहे.

सिलिगुडी कॉरिडॉरची सुरक्षा या चिनी वसाहतींमुळे धोक्यात येऊ शकते. हा कॉरिडॉर ईशान्येकडील ७ राज्यांना भारताशी जोडतो. सिलिगुडी कॉरिडॉरमध्ये एके ठिकाणी भारत-तिबेट (चीन)-भूतानच्या सीमा परस्परांना मिळतात. २०१६ मध्येच चीनने भूतानच्या भागात गावे वसवायला सुरुवात केली होती. आधी एक गाव वसवले होते. त्यानंतर गेल्या ८ वर्षांत २२ ४ लहानमोठी गावे, २ हजार २८४ घरे निर्माण झाली आहेत. या घरांमध्ये सुमारे ७ हजार लोक राहतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR