29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रछ. संभाजीनगरमध्ये एमआयएमचाच खासदार होणार

छ. संभाजीनगरमध्ये एमआयएमचाच खासदार होणार

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
भाजपने ‘अब की बार चारसौ पार’ म्हणत लोकसभा निवडणुकीचा देशभर माहोल तयार केला. प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र चित्र काहीसे वेगळे आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देशातील सर्वांत मोठा जल्लोष साजरा केला जाणार असून आपणच या जागेवर निवडून येणार असा दावा एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तसेच राज्यात कुणाला किती जागा मिळणार याचे भाकितही त्यांनी वर्तवले आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, राज्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली. त्यावेळी त्यांनी ४५ जागा जिंकण्याचा दावा करत येथून एमआयएमला उखडून फेकण्याची भाषा केली होती. तसेच या मतदारसंघात कमळ फुलवण्याचे आवाहनही केले होते. मात्र मराठी लोकांमध्ये एक प्रकारचा तेढ निर्माण करण्याचे पाप भाजपने केले आहे, असा हल्लाबोल इम्तियाज जलील यांनी केला.
या निवडणुकीत अनेक लोकांनी काँग्रेसऐवजी उद्धव ठाकरेंना साथ दिल्याचे दिसून आले. भाजपने मात्र स्वार्थापोटी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. भाजपचे फोडाफोडीचे राजकारण लोकांना अवडलेले नाही. आता देशात भाजपचे ‘४०० पार’ चे काय होईल माहीत नाही, राज्यातील चित्र मात्र नक्कीच वेगळे असणार आहे, असा दावाही इम्तियाज जलील यांनी केला.

राज्यात येऊन अमित शहांनी ‘मिशन ४५’ चा दावा केला होता. त्यानंतर त्यात घट होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४१ वर आले. आता त्यांनी जे काही दावे केले आहेत त्यातील निम्म्या जागा त्यांना मिळाल्या तरी खूप झाले, असा टोला लगावत छत्रपती संभाजीनगरमध्ये मीच जिंकणार असा दावाही इम्तियाज जलील यांनी केला.

ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये देशातील सर्वांत मोठा जल्लोष होणार आहे. तो सजारा करण्यासाठी सर्वांना निमंत्रण देतो. आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक निवडणुकीत आहेत. रिक्षा चालवणारे कोट्यवधींचे मालक झाले. राजकीय असे एकमेव क्षेत्र आहे की तेथे शेकडो कोटींनी उत्पन्न वाढवता येते. भाजपमध्ये असे ३०० खासदार असल्याने पंतप्रधान मोदी निवडणुकीत सुधारणा आणणार नाहीत, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR