जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी अतिशय कमी पाऊस पडत आहे , पेरणी योग्य तसेच पिकांना हवा तेवढा पाऊस पडत आहे परंतु तालुक्यातील जलस्त्रोतांमध्ये पाणीसाठा वाढावा असा मोठा पाऊस पडत नसल्यामुळे तालुक्यातील सर्व साठवण तलाव पाझर तलाव तसेच शेतक-यांच्या विहिरीही कोरड्याच आहेत. जुलै महिना अर्धा संपत आला तरी जलस्त्रोत कोरडेच असल्यामुळे तालुका वाशीयांचीचिंता वाढली आहे.
जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी पर्जन्यमान कमीच आहे. गतवर्षी देखील तालुक्यामध्ये अतिशय कमी पाऊस पडला होता . गतवर्षी देखील तालुक्यामध्ये साठवण तलाव तसेच पाझर तलाव मध्ये म्हणावा तेवढा पाणीसाठा वाढला नव्हता. अनेक साठवण तलाव तर दिवाळी झाली की कोरडे ठाक पडले होते. यामुळे तालुक्यामध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला तालुक्यातील जवळपास वीस गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता तसेच एवढ्याच गावांना अधिकरणाद्वारे पाणीपुरवठा सुरू होता . यानंतर पाऊस पडल्यामुळे प्रशासनाने टँकर बंद केले .
जळकोट तालुक्यामध्ये १४ जुलैपर्यंत घोंशी मंडळामध्ये ११३ किलोमीटर पाऊस पडला तर जळकोट मंडळामध्ये २३४ किलोमीटर पाऊस पडला. या पावसामध्ये मोठा पाऊस झाला नसल्यामुळे नदी नाले भरून वाहिले नाहीत यामुळे साठवण तलाव तसेच पाझर तलावामध्ये पाणीसाठा वाढला नाही तसेच जमिनीत खडा न फुटल्यामुळे विहिरीचे पाणीदेखील वाढले नाही. तालुक्यातील साठवण तलाव तसेच विहिरींना पाणी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. सोनवळा, हळदवाढवणा, जंगमवाडी, डोंगरगाव, माळहिप्परगा, रावणकोळा ढोरसांगवी, केकत शिंदगी, खंबळवाडी, गुत्ती १, गुत्ती २, डोंगर कोणाळी, हावरगा, चेरा १, चेरा २, असे साठवण तलाव आहेत परंतु या साठवण तलावामध्ये म्हणावा तेवढा पाणीसाठा वाढला नाही.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अधिक पाऊस पडत असतो परंतु यावर्षी जुलै महिना अर्धा संपला तरी मोठा पाऊस पडला नाही मृग नक्षत्र व आर्द्रा नक्षत्र हे दोन नक्षत्र संपलेले आहेत. दि ५ जुलै रोजी पुनर्वसू नक्षत्रामध्ये सूर्याने प्रवेश केला आहे परंतु या नक्षत्रात म्हणावा तसा पाऊस पडला नाही. आता शेतक-यांच्या आशा आहेत ते पुष्य नक्षत्रावर दि १९ जुलै रोजी हे नक्षत्र निघणार आहे.