जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या शहरातील श्री दत्त मंदिरात दि १९ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत अखंड दत्त नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . दररोज पहाटे ४ ते ६ भुपाळ्या व काकडा आरती, सकाळी ७ ते १० गुरुचरित्र पठण, नऊ ते दहा आरती तसेच भागवत कथा तसेच रात्री नऊ ते अकरा कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवपुराण कथा दररोज दुपारी २ ते ५ या कालावधीत होणार असून शिव कथाकार म्हणून म्हणून ह भ प आशिषानंद महाराज धारूरकर वानगंगा आश्रम उपस्थित राहणार आहेत . यांच्या अमृतवाणीतून शिव कथा ऐकावयास मिळणार आहे. दि २५ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्म कीर्तन होणार असून ह भ प आशिषाने महाराज धारूरकर कीर्तनकार असणार आहेत. तसेच २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दत्त जन्म पोथी आयोजित करण्यात आली आहे तर दुपारी एक ते पाच या कालावधीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून श्रीची पालखी मिरवणूक सायंकाळी ६ वाजता निघणार आहे .या दत्त जयंती यात्रा महोत्सव तसेच अखंड दत्त नाम सप्ताहाचा जळकोट जळकोट परिसरातील सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जळकोटचे व्यापारी तसेच जळकोट शहरवासीयांच्या वतीने करण्यात आले आहे.