26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रजळगावात २ सख्ख्या बहिणींवर अत्याचार

जळगावात २ सख्ख्या बहिणींवर अत्याचार

जळगाव : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जात आहे. जळगाव जिल्ह्यात ११ आणि १३ वर्षीय दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

१० सप्टेंबर रोजी नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर अत्याचार केला आहे. धरणगाव पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद हुसेन बारेला असे नराधमाचे नाव असून त्याला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे.

अत्याचार केल्यानंतर घरात कुणाला सांगितले तर दोघींना मारून टाकण्याची देखील धमकी आरोपीने दोन्ही मुलींना दिल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. दरम्यान पीडित मुलींनी हा प्रकार त्यांच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांच्या आईने थेट धरणगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली व संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार धरणगाव पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR