24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरजांभूळ फळाच्या भावात ३०० रुपयांनी वाढ 

जांभूळ फळाच्या भावात ३०० रुपयांनी वाढ 

लातूर : प्रतिनिधी
तालूक्यासह परिसरातून शहरातील बाजारपेठे रसरशीत जांभूळ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. जांभूळ हे एक लोकप्रिय फळ मानले जाते. सध्या शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जांभळाच्या भावात २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.
सध्या ग्रामीण भागातून बाजारपेठेत दाखल झालेल्या जांभूळ फळाला मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळया फळांची मागणी ग्राहक वर्गातून होत असते. मानवी शरिरासाठी पौष्टिक असलेल्या जांभूळ फळाला मागणी आहे. पावसाळा सुरू झाला की जांभळांना बहर येतो. परंतु यंदा वातावरणातील बदलामुळे बहर कमी आल्यामुळे फळाची आवक कमी प्रमाणात आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. आयुर्वेदामध्ये जांभळाला महत्त्वाचे स्थान आहे. शरीरातील जीवनसत्त्व वाढविण्यासाठी हे फळ प्रभावी मानले जाते. तसेच पावसाळी वातावरणात ते खाणे उत्तम मानले जाते.
शहरातील बाजारात सध्या २० किलो जांभळांना ९०० रुपयांचा भाव मिळत असल्याचे व्यापा-यांनी सागीतले. यंदा हवामानातील बदलामुळे जांभूळ फळाची आवक काही प्रमाणात कमी झालेली दिसून येत आहे. गतवर्षी जांभळाची २० किलोची जाळी साधारणपणे ५०० ते ६०० रुपयांपर्यंत विकली जात होती. मात्र यंदा ७०० ते ९०० रुपये मोजावे लागत असल्याचे व्यापा-यांनी सागीतले आहे. शहरातील विविध भागात गेल्या काही दिवसापासून जांभूळ विक्रीत्यांनी आपली दुकाने थाटली असल्याचे दिसून येत आहे. या स्टॉलवर ग्रामिण भागातून आलेले रसदार जाबुळ लातूरकरांचे लक्ष वेदून घेत आहे. तर किरकोळ बाजारात ७० ते ८० रूपये किलोने या जांभळांची विक्री केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR