29.6 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeलातूरजि. प. च्या बहुतांश शाळांत अंधार दाटला

जि. प. च्या बहुतांश शाळांत अंधार दाटला

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या शाळेत गरीबांची लेकरे शिकतात. या शाळेंच्या प्रगतीकडे बघणेतर सोडा, जिल्हयातील बहूतांश शाळांत अद्याप विजच पोहचली नाही. जिथे पोहचली तेथील विजबील न भरल्यामुळे अशा शाळांचे विज कनेक्शन कट करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अंधार दाटला आहे. तो केंव्हा दूर होणार अशी भाबडी अशा ग्रामीण भागातील नागरीकांची आहे.
लातूर जिल्हयात जिल्हा परिषदेच्या १ हजार २७३ शाळा आहेत. यापैकी २०६ शाळेत विद्यूत पूरवठा पोहचलाच नाही. उर्वरीत शाळेत विद्यूत पुरवठा पोहचला असला तरी विज भरण्यासाठी शाळेकडे पैसे नसल्याने सदर शाळांचा विद्यूत पुरवठा कापण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हयातील बहूतांश शाळांत अंधार दाटला आहे. या शाळेत अत्याधुनिक पध्दतीचे शिक्षण कसे मिळणार असा प्रश्न निर्माण होत आहे. शिक्षणाचा लातूर पॅटर्नतर सोडा, विद्याथ्यांंना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षकही उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधुनिक शिक्षणाचे धडे कसे मिळणार, विज्ञानाच्या नुसत्या गप्पाच आपणाला ऐकायला मिळतात.
जिल्हयातील बहूतांश शाळांना पालकांनी लोक सहभागातून संगणक, टिव्ही भेट दिले आहेत. शाळेत विजेची सोयच नसेलतर हे साहित्य धूळखात पडून राहून खराब होत आहे. शासनाही इतर मोफत योजना वाटप करत आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठी लागणा-या ग्रामीण भागातील शाळांच्या विकासांकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत शिक्षक बहूंतांश आपल्या पाल्यांना खाजगी शाळेत शिकवित असल्याने त्यांनाही तेवढा जिल्हा परिषदेच्या शाळेत फारसा रस दिसून येत नाही.  जिल्हा परिषदेच्या शाळेतही वातानुकूलीत वातावरण असले पाहिजे, ते तयार करण्यासाठी विजेची गरज आहे. विज असेलतरच फॅनची सोय होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR