19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रजैशशी संबंध, १९ ठिकाणी छापे

जैशशी संबंध, १९ ठिकाणी छापे

३ तरुण ताब्यात, एनआयएकडून चौकशी सुरू
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
अमरावती, भिवंडी, छत्रपती संभाजीनगरसह १९ शहरांमध्ये एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले. एनआयने अमरावतीच्या छायानगरमधून एकाला आणि भिवंडीच्या खोणी खार पाडीमधून दोघेजण ताब्यात घेण्यात आले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित संशयितांच्या ठिकाणांवर छापे टाकून ही कारवाई केली. आता त्यांची चौकशी सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास भागात असलेल्या एनआयएने २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. भिवंडीतील खोणी खार पाड ग्रामपंचायत परिसरातून ४५ वर्षीय कामरान अन्सारीला ताब्यात घेण्यात आले. याशिवाय अमरावतीतील छायानगरमधून ३५ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या एनआयएकडून तिघांची कसून चौकशी सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणांचा देशविरोधी कारवाया करणा-या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याचा संशय आहे.

भिवंडी शहरालगतच्या खोणी-खाडीपार ग्रामपंचायत परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने पहाटेच्या सुमारास कारवाई केली. या या कारवाईत सापळा रचून एका इसमाला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव कामरान अन्सारी (४५) असे आहे. देशविरोधी संघटनेशी संपर्क असल्याच्या संशयावरून कामरान याला एनआयएने ताब्यात घेतले आहे. कामरान अन्सारी हा खाडीपार परिसरात असलेल्या डोंगरकर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कुटुंबासह राहत होता. कामरान हा मूळ मालेगावचा रहिवासी आहे. आता त्याची चौकशी सुरू आहे.

भिवंडीत एनआयने पहाटेच्या सुमारास कारवाई केली. खोणी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. कामरान अन्सारी याचा पाकिस्तानशी संपर्क असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. यासोबतच अमरावतीमधून एका युवकाला छायानगर मधून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या युवकाचं नाव मोहम्मद मुसेब शेख इसा आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे.

संशयित दस्तावेज जप्त
एनआयएने गुरुवारी पहाटेपासूनच देशभरात कारवाईला सुरूवात केली. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेद्वारे देशभरात तरुणांची माथी भडकवण्याचा प्रकार सुरू होता. या अनुषंगाने काही संशयीतांविरोधातही कारवाई करण्यात आली. यावेळी संशयित दस्तावेज व संगणक उपकरणेही जप्त करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वीच एनआयएने पाच राज्यांमधील २६ ठिकाणी छापे टाकले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR