पुणे : प्रतिनिधी
विधान सभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय स्थित्यंतरे मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षात सध्या मोठ्या प्रमाणात अनेक दिग्गजांचे जाहीर प्रवेश होत आहेत. अशातच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, कवी, लेखक, दिग्दर्शक, गीतकार असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मा. शरद गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे जाहीर प्रवेश केला.
पुण्याचा व राज्याचा सांस्कृतिक वारसा जपण्याची ताकद शरद गोरे यांच्या मध्ये आहे आणि मा. शरद पवार साहेबांनी दिलेला सांस्कृतिक वारसा शरद गोरेच पुढे नेऊ शकतात असे जयंत पाटील म्हणाले. यावेळी उपस्थितांना संबोधताना शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट कशा पद्धतीने महाराष्ट्रात रुजवत आहे व त्यासाठी साहित्यिक व विचारवंतांची फळी निर्माण करण्याचा आव्हान मी पेलणार आहे असे प्रतिपादन शरद गोरे यांनी यावेळी केले.
त्यांच्यासोबत साहित्य परिषदेच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला. छ्त्रपती शहाजीराजे भोसले महाराजांच्या तंजावर संस्थानाच्या गादीचे १३वे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही यावेळी शरद गोरे यांना जाहीर पांिठबा देत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी संभाजी बिग्रेडचे संस्थापक प्रदेश कार्याध्यक्ष भरत मानकर,किर्ला गावचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे अध्यक्ष अनिल खंदारे,फादर फाऊंडेशनचे सचिव व सुप्रसिध्द कवी,किशोरदादा टिळेकर, ज्येष्ठ साहित्यिक सूर्यकांत नामूगडे,
ज्येष्ठ कवी सीताराम नरके, सुप्रसिध्द सिने कलावंत रमाकांत सुतार,साहित्य परिषदेचे प्रदेश संघटक अमोल कुंभार,चर्मकार संघाचे सचिव महादेव आबनावे, सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते व निर्माता नितीन पाटील, अॅड. सुमेध गायकवाड, सदाशिवराव जाधव, प्राचार्य संजय जाधव, प्रा.आशा शिंदे, साहित्य परिषदेचे माजी विश्वस्त संदीप कुंजीर, सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव गायकवाड, अंिजक्य नलावडे, संदीप कामठे, मनिषा गाडे,पांडूरंग कोठूले, सिध्देश्वर मोरे यावेळी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष मा. प्रशांतदादा जगताप,प्रदेश प्रवक्ते,अंकुशआण्णा काकडे, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, शिरूरचे आमदार अशोकबापू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.