18.4 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeराष्ट्रीयटँकर स्फोटातील मृतांची संख्या ११ वर

टँकर स्फोटातील मृतांची संख्या ११ वर

जयपूर : राजस्थानमधील जयपूर-अजमेर रस्त्यावर एका एलपीजी टँकरचा स्फोट झाला. या अपघातामधील मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. अपघातानंतर आगीच्या ज्वाळांनी आसमंत भरुन गेला. तब्बल २०० फूट उंचीपर्यंत आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

जयपूर-अजमेर रस्त्यावर एलपीजी-सीएनजी टँकरची धडक झाली. त्यानंतर झालेल्या अग्निकांडात ११ जणांचा जीव गेला. यातील एक जण तर अतिशय अभागी ठरला. अपघातानंतर झालेल्या स्फोटात तो जिवंत जळाला. त्याचा मृतदेह इतक्या भीषण पद्धतीने जळून गेला की तो एका प्लास्टिकच्या लहानशा पिशवीत ठेवण्यात आला. मृतदेहाचे केवळ अवशेष हाती लागले. हे अवशेष ट्रक चालकाच्या मृतदेहाचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप तरी त्याची ओळख पटलेली नाही.

राजस्थानातील जयपूर-अजमेर महामार्गावर शुक्रवारी सकाळी एलपीजीनं भरलेल्या एका टँकरने अन्य टकर आणि ट्रकला धडक दिली. त्यानंतर टँकरचा स्फोट झाला आणि त्याने पेट घेतला. आसपासच्या अन्य वाहनेदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यानंतर अग्नीतांडव सुरू झाले. अनेक ट्रक जळाले. त्यांची नेमकी संख्या अद्याप समजू शकली नाही. आगीत होरपळलेल्यांना रुग्णवाहिकांतून रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR