21.1 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeअंतरराष्ट्रीयटेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री

टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री

सात किमीपर्यंत मारा; एलन मस्क चक्रावले

 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

चेचेन्या या दहशतवादी गटाचा म्होरक्या रमजान कादिरोवने टेस्लाचे दोन सायबर ट्रक युक्रेनविरुद्धच्या युद्धात उतरविले आहेत. एवढी महागडी बहुउपयोगी कार युद्धात उतरविण्यात आल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

जगप्रसिद्ध अब्जाधीश एलन मस्क यांच्या कंपनीचा हा सायबर ट्रक आहे. हा ट्रक चेचेन्यांना कसा मिळाला हा एक मोठा प्रश्नच आहे. एकीकडे अमेरिका युक्रेनला रशिया विरोधात शस्त्रास्त्रे पुरवत असताना अमेरिकेतील सर्वात अद्ययावत आणि दणकट ट्रक युक्रेनविरोधात वापरला जात आहे.

कादिरोवचा असा दावा आहे की, त्याला स्वत: एलन मस्कनी सायबर ट्रक गिफ्ट केले आहेत. मस्क यांनी या दाव्याचे खंडन केलेले असले तरी फोटोत सायबर ट्रक, त्यावर गन लोड केलेली दिसत आहे. १९ सप्टेंबरला कादिरोवने केलेल्या दाव्यात मस्क यांनी हे सायबर ट्रक रिमोटली डिस्कनेक्ट केले आहेत. परंतू मला याचा काहीच फरक पडत नाही. या गाड्या विना रिमोट देखील चालू शकतात. याचा वापर आम्ही योग्य प्रकारे करत आहोत, असे त्याने म्हटले आहे.

आज, २० सप्टेंबरला पश्चिमी देशांची शस्त्रे त्यांच्याच साथीदारांविरोधात एकदम योग्य आणि अचूक काम करत आहेत. या वाहनांना कादिरोवने हिरवा रंग दिला आहे.

मशीनगन तर त्याहून भारी…
एम२ ब्राउनिंग मशीन गन या सायबर ट्रकवर बसविण्यात आली आहे. ही गन प्रति मिनिट ४५० ते ६०० राउंड फायर करते. ८९० मीटर प्रति सेकंद वेगाने शत्रूच्या दिशेने गोळी जाते. गन १.८ किलोमीटर ते ७.४ किलोमीटरपर्यंत गोळीबार करू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR