निलंगा : प्रतिनिधी
लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावर दि २८ डिसेंबर गुरुवार रोजी रात्री दहाच्या दरम्यान गौरपाटीवर ट्रक व कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे खाजगी स्वीयसहाय्यक अरंिवंद चव्हाण व भाजपचे निलंगा शहराध्यक्ष तम्मा माडीबोणे हे गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला आहे . यामधील सहा जण जेवणासाठी बसलेले बाचले आहेत .
लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावर निलंगा तालुक्यातील गौरपाटी येथे लातूरकडे जाणारा ट्रक क्रमांक एम. एच. २४ जे. ६४ ४६ व लातूरकडून गावाकडे जाणा-या कार क्रमांक एम. एच. २४ ए. डब्ल्यू. ६७ २५ यांच्यात दि २८ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास गौर पाटीवरच्या डिव्हाडरजवळ समोरासमोर जोराची धडक झाली. यात कारला एअरबॅग असल्याने कारमधील दोघेजण बचावले. यात अरंिवद चव्हाण व तमा माडीबोने गंभीर जखमी झाले. येथील तरुणांनी त्यांना गाडीच्या बाहेर काढून उपचारासाठी त्वरित लातूर येथील खाजगी रुग्णालयात पाठविले . त्यांच्यावर लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात झाल्यानंतर ट्रक बाजूच्या गोंिवद शिंदे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. या शेडमध्ये असलेले सहा जण बालमबाल बचावले आहेत.