ठाणे : काल ठाण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ, सुपारी फेकत मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. यावर ठाणे पोलिसांनी अॅक्शन घेत या राड्या प्रकरणी ४४ मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
या हल्ल्या प्रकरणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे तर प्रितेश मोरे, आकाश पवार, मनोज चव्हाण यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात ३२ महिला आणि १२ पुरुष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, शांतता भंग करणे, यासोबतच अन्य कलमे लावण्यात आली आहेत.