28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeउद्योगडिजिटल इंडियामुळे भारत बदलला : मोदी

डिजिटल इंडियामुळे भारत बदलला : मोदी

लवकरच ६-जी सेवेवर काम करणार

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया मोबाइल काँग्रेस २०२४ चे उद्घाटन केले. यावेळी या कार्यक्रमाची थीम ‘The Future is Now’ आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर हा कार्यक्रम १८ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारतातील दूरसंचार क्रांतीच्या क्षेत्रात अलीकडच्या काळात झालेली प्रगती अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

गेल्या दहा वर्षांत भारतात मोबाईल आणि इंटरनेटच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. ५-जीने एक परिवर्तन दिले आहे. आम्ही लवकरच ६-जीवर देखील काम करणार आहोत. २१व्या शतकात भारताचा मोबाईल आणि टेलिकॉम प्रवास संपूर्ण जगासाठी विशेष आवडीचा विषय बनला आहे. सध्याच्या काळात भारतात १२० कोटी मोबाइल युजर्स आणि ९५ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही देशाची महत्त्वाची कामगिरी आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा लोकल आणि ग्लोबल एकत्र येते, तेव्हा जगाला नवे लाभ मिळतात. टेलिकॉम आणि कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात भारताचे मॉडेल काहीसे वेगळे आहे. भारतात आम्ही दूरसंचार हे केवळ कनेक्टिव्हिटीचे माध्यम नाही तर समानता आणि संधीचे माध्यम बनवले आहे.
सिल्क रूट ते टेक्नॉलॉजी रूट
आजचा भारत जगाला वादातून बाहेर काढण्यात आणि संपर्कात आणण्यात गुंतला आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, प्राचीन सिल्क रूटपासून ते आजच्या टेक्नॉलॉजी रूटपर्यंत जगाशी संपर्क साधणे आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडणे हे एकच भारताचे ध्येय राहिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR