डोंबिवली : प्रतिनिधी
उल्हास नदी ही कल्याण-डोंबिवलीतील लाखो नागरिकांची जीवनदायिनी आहे. केडीएमसीकडून या नदीचे पाणी उचलून नागरिकांना पुरवले जाते. मात्र नदी शेजारी असलेल्या कंपन्यांकडून आणि पालिकेकडून केमिकलयुक्त पाणी नदीत टाकले जाते.
डोंबिवलीत १२ तास पाण्यात उभे राहुन जलआंदोलन, मनसेच्या आंदोलनास राष्ट्रवादी अन् सत्तेत असणा-या शिवसेनेची साथ माजी नगरसेवक नितीन निकम यांचे डोंबिवली-उल्हासनगरची जीवनदायिनी नदी असलेली उल्हास नदीच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन सुरु झाले आहे. १२ तास पाण्यात उभे राहून मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी आंदोलन सुरु केले आहे.
त्यांच्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि सत्तेत असलेली शिवसेनासुद्धा उतरली आहे. गुरुवारी सकाळी सात वाजेपासून त्यांचे आंदोलन सुरु झाले आहे.
केमिकलयुक्त पाणी नदीत