लातूर : प्रतिनिधी
एकविसाव्या शतकात आज प्रत्येकाकडे मोबाईल, टॅबलेट उपलब्ध आहे. रोजच्या दैनंदिन व्यवहारासोबतच शेतक-यांनीही शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास तंत्रज्ञान ही शेतक-यांसाठी संजीवनी ठरेल असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी व्यक्त केले. कृषि महाविद्यालय, लातूर येथे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी विविध उपक्रमांना तसेच रासायनिक शेतीतून टप्या टप्याने एकात्मिक शेतीकडे वाटचाल या प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. विश्वनाथ कांबळे, डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. प्रशांत करंजीकर, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. संतोष कांबळे, डॉ. विजय भामरे, डॉ. राजेश शेळके, डॉ. ज्योती देशमुख, डॉ. अनंत शिंदे, डॉ. पद्माकर वाडीकर, डॉ. अनिलकुमार कांबळे, डॉ. विनोद शिंदे, डॉ. सुनीता मगर, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ. दयानंद मोरे, डॉ. संघर्ष शृंगारे, डॉ. अजित पुरी, भगवान कांबळे, राहुलदेव भवाळे, देविदास चामणीकर इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कृषि महाविद्यालय हे नेहमी शेतक-यांना त्यांच्या समस्या निराकरण करणारा सच्चा दोस्त वाटावा. याप्रकारे महाविद्यालयाने आगामी काळातही अशीच वाटचाल करावी याकरिता शुभेच्छा देत डॉ. मणि यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना शैक्षणिक प्रगतीविषयी मार्गदर्शन केले. तसेच कार्यानुभवातून शिक्षण या उपक्रमाच्या माध्यमातून निर्मित विविध वस्तूंची पाहणी करून त्यांचे कौतुक केले.