24.7 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeलातूरतपासासाठी सीबीआयने लातूरातील मुक्काम वाढवला

तपासासाठी सीबीआयने लातूरातील मुक्काम वाढवला

लातूर : प्रतिनिधी
नीट २०२४ पेपरफुटी प्रकरणी आता सीबीआयच्या कोठडीतील जलीलखाँ पठाण या संशयीत आरोपीच्या न्यायालयीन कोठडी पाठोपाठ अटकेतील दुसरा संशयीत आरोपी संजय तुकाराम जाधव याची ही न्यायालीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सीबीआयच्या कोठडीतील दोन्ही संशयीत आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सीबीआयच्या रडारवर आता फरार असलेला संशयीत आरोपी इरन्ना कोनगलवार असून त्याच्या अटकेनंतरच सीबीआय आपला लातूरातील मुक्काम हलवणार, असे काहीशे चित्र आहे.

मागच्या शनिवारी नीट २०२४ पेपरफुटी प्रकरणातील संशयीत आरोपी जलील पठाण याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी व दुसरा संशयीत आरोपी संजय जाधव याला दोन दिवसाची सीबीआय कोठडी द्यावी अशी विनंती सीबीआयने न्यायालयाकडे केली होती न्यायालयाने ती मान्य केली होती. सोमवारी दुपारी संजय जाधव याची कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला सीबीआयने न्यायालयासमोर हजर करून त्याची न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी विपनंती केली या नंतर न्यालयाने ही सीबीआयची विनंती मान्य करत संशयीत आरोपी संजय जाधव याला न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

सीबीआयच्या ताब्यातील दोन्ही आरोपीच्या न्यालयीन कोठडीनंतर सीबीआय काही दिवस विश्रांती घेईल व लातूरातील आपला मुक्काम काही दिवसासाठी लातूरातून हलवेल असे भाकीत ही काही जण व्यक्त करीत होते. असे असताना मागच्या दहा दिवसापासून लातूरात तळ ठोकून असलेल्या पथकाने आपला लातूरातील मुक्काम वाढवला असून आता त्यांच्या रडारवर फरार असलेला संशयीत आरोपी इरन्ना कोनगलवार हा रडारवर असून त्याचा शोध सीबीआकडून घेतला जात असून लवकरच त्याला गजाआड करण्यात सीबीआयला यश येईल असे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR