नागपूर : प्रतिनिधी
जगप्रसिद्ध तबला वादक, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन झाले आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, जगप्रसिद्ध तबला वादक, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन झाले आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने भारतीय संगीतविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आले आहे.
तबला वादक पद्मविभूषण उत्साद झाकीर हुसैन यांचं निधन झाल्याची बातमी ही कळली. ख-या अर्थाने तबल्यापासून ताल वेगळा झाल्यानंतर जी पोकळी निर्माण होईल, तशाप्रकारची पोकळी ही त्यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे. तबला वादनाला आंतरराष्ट्रीय स्वरुप हे झाकीर हुसैन यांनी दिलं. जवळपास ३ पिढ्यांना त्यांच्या मैफीलींनी मंत्रमुग्ध केले. त्याचा तो बाज, त्यांचा तो आवीरभाव आणि त्यांच्या बोटातली जादू हे बघणं म्हणजे एक पर्वणी होती. लाखो तरुणांना त्यांनी तबला वादनाकडे आकृष्ट केलं. त्यामुळे प्रत्येक तबला वादकाचं एकच ध्येय असायचं की, मला उत्साद झाकीर हुसैन यांच्यासारखा तबला वाजवायचा आहे.
देवेंद्र फडणीवस म्हणाले की, खरं तर मी असे म्हणेन की, ही अशी शती आहे, जी कधी भरून निघू शकत नाही. झाकीर हुसैन यांच्याकडून प्रेरणा घेतलेले, त्यांच्या कुटुंबातील मंडळी असतील किंवा इतरही अनेक शिष्यांच्या माध्यमातून त्यांच्या तबला वादनाची पद्धत चिरकाल जीवंत राहील. पण आता मैफीलीमध्ये ते दिसणार नाहीत, ही खंत प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल. मी त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.