लातूर : प्रतिनिधी
येथील श्री देशिकेंद्र विद्यालयात तब्बल ३० वर्षांनंतर १९९४ च्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी दि. १ जून रोजी एकत्रीत आले. स्नेह मेळाव्यानिमित्त एकत्र आलेल्या आपलया वर्ग मित्र, मैत्रिणींनी एक सुखद अनुभव घेतला. शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी सर्वांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक बुरांडे होते. यावेळी करपे, श्रीमती महाजन, मुख्याध्यापक आर. एस. सगर, माजी शिक्षक बिडवे, कारभारी, गिरवलकर, श्रीमती मंगलगे, श्रीमती धानूरे, श्रीमती शहरकर, संस्थेचे विश्वस्त संगे, बुके, राजू येरटे यांची उपस्थिती होती. माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. रेणुका, सुरेखा, राजश्री, प्रकाश, रुपाली, अविनाश यांनी आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा रोपटे व स्मृती चिन्ह भेट देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विद्या नाईक, डॉ. शीतल पाटील यांनी केले. डॉ. बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले. प्रास्ताविक डॉ. प्रकाश पवार व माजी सैन्य अधिकारी शीतल देशमुख यांनी मांडले. कार्यक्रमाचे नियोजन सचिन माळवदकर, सचिन लोया, धनराज चरक यांनी केले होते.