25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Home... तर सुनीता विल्यम्सची अंतराळात वाफ होणार!

… तर सुनीता विल्यम्सची अंतराळात वाफ होणार!

स्टारलाईनर ।  अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाचा मार्ग धोकादायक, मात्र सुखरूप आणण्यासाठी ‘नासा’चे शर्थीचे प्रयत्न

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेतील संशोधन संस्था ‘नासा’मध्ये कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स मागच्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकून पडल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे एक सहकारी बुच विल्मोर हेही आहेत. अंतराळ यानात झालेल्या बिघाडामुळे या दोघांच्या परतीचा प्रवास लांबणीवर पडलेला आहे. दरम्यान, या दोन्ही अंतराळवीरांना सुखरूप परत आणण्यासाठी नासा प्रयत्नशील आहे.
दरम्यान, अमेरिकेचे माजी मिलिट्री स्पेस सिस्टिम कमांडर रुडी रिडोल्फी यांच्या एका वक्तव्यामुळे सुनीता विल्यम्स यांच्या सुखरूप परत येण्याबाबतची च्ािंता वाढली आहे. ‘डेली मेल’शी बोलताना रिडोल्फी यांनी स्टारलाईनरच्या परतीच्या प्रवासाच्या मोहिमेतील तीन संभाव्य धोक्यांबाबत माहिती दिली आहे.
सुरक्षितपणे पृथ्वीवर परतण्यासाठी स्टारलाईनरच्या सर्व्हिस मॉड्युलने कॅप्सूल योग्य कोनामध्ये ठेवली पाहिजे. जर अलायमेंटमध्ये चूक झाली तर त्याचे परिणाम भयंकर होतील. रिडोल्फी यांनी सांगितले की, जर कॅप्सूल योग्य पद्धतीने लाइनअप झाली नाही तर तर पृथ्वीवर परतताना ती जळून खाक होईल किंवा अंतराळात परत फेकली जाईल. जर सर्व्हिस मॉड्युलने कॅप्सूलला खूप अधिक कोनामध्ये ठेवलं तर हिट शिल्ड फेल होऊ शकते. त्यामुळे कॅप्सूलचं तापमान प्रचंड वाढू शकतं. रिडोल्फी यांनी सांगितलेल्या ३ शक्यता अशा…
१) स्टारलाईनर खराब थ्रस्टर आणि केवळ ९६ तास पुरेल एवढ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे अंतराळातच अडकू शकते. कॅप्सुल चुकीच्या पद्धतीने परत आणण्याच्या प्रयत्नांदरम्यान, वातावरणाशी होणार-या घर्षणामुळे असं घडू शकतं.
२) चुकीच्या अलायन्मेंटमुळे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यास अपयशी ठरेल. त्यामुळे ते अंतराळातच अडकून पडेल.
३) जर कॅप्सुल वातावरणामध्ये अधिक अँगलने प्रविष्ट झाली, तर मोठ्या प्रमाणावर होणा-या घर्षणामुळे ती जळून जाईल. तसेच त्याच्यामध्ये बसलेल्या अंतराळवीरांची वाफ होऊन जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR