लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाने काय केले? आम्ही काय केले म्हणून काय विचारता? तुमच्या घरासमोरचा रस्ता आम्ही बांधलाय, या शब्दांत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.
महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या जनसंपर्क अभियानांतर्गत दि. १५ नाव्हेंबर रोजी सायंकाळी शहरातील प्रभाग १, ८ व ९ मध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. त्या रॅलीच्या समारोप प्रसंगी पटेल चौकात माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता लातूर शहरातील प्रभाग ८ मधील शिवनेरी हॉटेल येथून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचार रॅलीचा प्रारंभ झाला. खोरी गल्ली, रमा बिग सिनेमा, विलासराव देशमुख पार्क, उस्मानपुरा, महात्मा बस्वेश्वर महाविद्यालय, खंडोबा गल्ली, औसा हनुमान, आझाद चौक, भोई गल्ली, कुरेशी मोहल्ला, दयाराम रोड, पतंगे निवास, खडक हनुमान, तेली गल्ली, पटेल चौक, हजरत सुरत शाहवली दर्गा, गणपती चौक, माळी गल्ली आणि पटेल चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीच्या प्रारंभीच हजारोंच्या संख्येत नागरिक तिरंगी व महाविकास आघाडीचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या रॅलीची सुरुवात होताच काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदूमून गेला. रॅली मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रांगोळी काढून मार्ग सुशोभित केला होता. अनेक घरांच्या छतावरून रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. हातात फलक, झेंडे घेऊन मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी लोकनेते विलासरावजी देशमुख पार्क येथील श्री महादेव वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्या नंतर महात्मा बसवेश्वर कॉलेजसमोरील जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
या वेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, अमर जाधव, अहमदी बेगम, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पडिले, शेतकरी कामगार पक्षाचे नेते अॅड. उदय गवारे, अशोक गोविंदपूरकर, एकनाथ पाटील, अमर राजपूत, सपना किसवे, कुणाल वागज, चांदपाशा इनामदार, समद पटेल, मोईज शेख, अॅड. फारुक शेख, शिवकन्या पिंपळे, सत्तार शेख, अजय यादव, इसरार सगरे, फैसलखान कायमखानी, इमरान सय्यद, व्यंकटेश पुरी, सुपर्ण जगताप, अॅड. गोपाळ बुरबुरे, विष्णु धायगुडे, रमाकांत गडदे, अभिषेक पतंगे, गौस शेख, इनायत सय्यद, राम स्वामी, गीता गौड, रईस टाके, अतिक बासले, अभिषेक किसवे, योगेश स्वामी, राहुल रोडे, दीपक राठोड, कलीम शेख, अरफात खान, तबरेज तांबोळी, अजय वागदरे, फैजल पठाण, प्रसाद धम्मा, महेश कोळे, अकबर माडजे, अभिषेक पतंगे, विद्या सागावे, मीना सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सागावे आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक महिला उपस्थित होत्या.