शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील तुरूकवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशाबी अयुब शेख यांची सोमवारी घेण्यात आलेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर गावातून मिरवणुक काढून समर्थकांतून जल्लोष व्यक्त करण्यात आला. तुरुकवाडी तत्कालीन सरपंच हरीश्चंद्र कोतवाडे यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या रिक्त जागेवर सर्व सदस्यांच्या उपस्थितीत आशाबी अयुब शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी अध्याशी अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमोल गायकवाड यांनी तर सहाय्यक अधिकारी म्हणून ग्रामसेवक किशोर मुळे यांनी काम पाहिले.
याप्रसंगी माजी सरपंच हरिंश्चद्र कोतवाडे, विद्यमान उपसरपंच नूरबी वहाब शेख, ग्रा.प.सदस्य शब्बीर पटेल, शबाना अहमद खुर्दळे, संगीता नागनाथ गड्डीमे, संगीता रमाकांत कांबळे हे उपस्थित होते. दरम्यान तुरुकवाडी ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी मला सरपंचपदी काम करण्याची संधी दिली असून येणा-या काळात गावाच्या सर्वांगिण विकास कामासाठी कटीबद्ध असल्याचे निवडीनंतर नुतन सरपंच आशाबी अयुब शेख यांनी दैनिक एकमतशी बोलताना सांगितले.
यावेळी प्रा.महताब शेख, वहाब शेख, अहेमद खुर्दळे, निजाम पटेल,अहेमद शेख,रसूल पटेल,आयुब शेख,मुस्तफा पाशा पटेल,चाँद नवाज पटेल,अयुब पटेल,रमाकांत कांबळे,शाहरुख पटेल, रब्बानी पटेल, त्र्यंबक अरदे, हणमंत चामले, भागवत अनंतराम गड्डीमे, पोलीस पाटील राम कोतवाडे, मुनीर शेख, असिफ शेख, खयूम शेख, इलाही देशमुख, इमाम शेख, शंकर सूर्यवंशी, महमूद खुर्दळे, सिकंदर शेख, अनवर शेख, उस्मान शेख, युसूफ शेख, अजान शेख आदी ग्रामस्थांनी उपस्थित राहून नूतन सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या