22.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeपरभणीथकीत कर न भरणा-यांची नावे होर्डींग्जवर झळकणार

थकीत कर न भरणा-यांची नावे होर्डींग्जवर झळकणार

न.प. मुख्याधिकारी कोमल सावरे यांचा थकबाकीदारांना इशारा

मानवत : नगरपरिषदच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक कोमल सावरे यांच्या नेतृत्वात विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली. दुकान, जमीन भाडे व नगरपरिषदेचा कर ज्या नागरिकांकडे मोठ्या प्रमाणामध्ये थकबाकी आहे.

अशा सर्व थकबाकीदार यांना १५ फेब्रुवारी पर्यंत अंतिम तारीख देण्यात आली असून यानंतर सुद्धा ज्या थकबाकीदारांनी थकबाकी वेळेत भरणार नाहीत त्यांची नावे नगरपरिषदेच्या वतीने शहरातील बस स्टॅन्ड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मार्केट, नगर परिषद इत्यादी ठिकाणी होल्डिंग लावून प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच त्यांच्याकडे असलेली थकबाकी पीटीआर वरती बोजा म्हणून टाकण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी यांच्या वतीने देण्यात आला आहे. शहरातील सर्व थकबाकीदार नागरिकांनी याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील सर्व नागरिकांनी आपल्याकडे असलेली थकीत घरपट्टी, नळपट्टी, जमीन भाडे, गाळा किराया भरणा करून नगर परिषदेत सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभाग निहाय डोअर टू डोअर वसुली मोहीम राबविण्यात येणार आहे असे मुख्याधिकारी श्रीमती सावरे यांनी सांगितले. आज सावली कलेक्शन या दुकानास सील ठोकले असून थकबाकीदार यांच्यावर कडक कार्यवाही करण्याचे सत्र सुरू झाले आहे. उद्या पासून अशीच वसुली मोहीम राबवली जाणार आहे असे नमूद केले. शहरातील सर्व नागरिकांनी त्वरित थकीत कर भरणा करून नगर परिषदेत सहकार्य करावे असे आवाहन श्रीमती सावरे यांनी केले आहे.

या कर वसुली उपक्रमामध्ये नगर परिषदेचे संतोष उन्हाळे, भगवान शिंदे, महेश कदम, प्रकाश हारकळ, भागवत भोसले, भारत पवार, रामराव चव्हाण, शताणिक जोशी, संतोष खरात, राजेश शर्मा, एम.डी.पठाण, हनुमंत बिडवे, मनमोहन बारहाते, नारायण व्यवहारे, पंकज पवार, सचिन सोनवणे, भगवान बारटक्के, रवी दहे, रुद्रवार, दीपक सातभाई, शिवाजी कचवे, सय्यद जावेद, शेख वसीम, रितेश भदर्गे, सचिन सोनवणे, नारायण काळे, सोनाजी काळे, बाळाभाऊ लाड, मुंजा डोळसे, संजय कु-हाडे, नारायण व्यवहारे, सुनील कीर्तने, दीपक भदरगे, राजेश भदर्गे, रवी धबडगे तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेतला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR