24.4 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रदंगल भडकविणा-या पोस्ट व्हायरल, तिघांना अटक

दंगल भडकविणा-या पोस्ट व्हायरल, तिघांना अटक

पोलिसांची मोठी कारवाई धारावी मशीद प्रकरण

धारावी : धारावीत जमावाने जोरदार विरोध करत गोंधळ घातल्याची घटना समोर आली होती. बीएमसीच्या वाहनाच्या काचाही फोडल्या. याप्रकरणी आता धारावी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांवरही दंगल भडकवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कलम १३२, १८९ (१,२), १९०, १८४(४), १९१(२), ३२४(३), १९१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कलम १३२ अजामीनपात्र आहे. सरकारी कर्मचा-याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल कलम १३२ लागू आहे. सध्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

या घटनेनंतर धारावी पोलिस स्टेशनपर्यंत सुमारे ५ हजार लोकांचा जमाव जमल्याचे समोर आले होते. या गर्दीत अनेक बाहेरचे लोकही होते. पोलिस धारावी बाहेरून आलेल्या लोकांची ओळख पटवत होते. बीएमसीच्या विध्वंसाच्या कारवाईच्या विरोधात जमाव जमवण्यासाठी भडकाऊ पोस्ट आणि व्हीडीओ बनवण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.

या पोस्ट आणि व्हीडीओ शुक्रवारी रात्रीपासून व्हायरल होऊ लागले. बीएमसीच्या कारवाईच्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी धारावीतील मशीद परिसरात मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. आंदोलक रस्त्यावर बसले. यानंतर पोलिसांचे पथक आले आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वाहने जाऊ शकतील यासाठी त्यांना बाजूला करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांची समजूत काढण्यासाठी स्थानिक लोकही पुढे आले. याप्रकरणी बीएमसीने बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी मशीद समितीला आठ दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत बीएमसी मशिदीवर कोणतीही कारवाई करणार नाही. दरम्यान या मशिदीवर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी मुस्लीम समुदाय न्यायालयात धाव घेणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR