18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयदरभंगा एक्स्प्रेस मालगाडीला धडकली

दरभंगा एक्स्प्रेस मालगाडीला धडकली

तामिळनाडूत रेल्वे अपघात, एक्स्प्रेसचे ८ कोच रुळावरून घसरले
चेन्नई : वृत्तसंस्था
तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात प्रवासी रेल्वे आणि एक मालगाडी यांच्यात टक्कर झाली. म्हैसूर दरभंगा एक्स्प्रेसची एका मालगाडीला धडक बसल्याने आठ डबे रुळावरून घसरले. दोन रेल्वेची धडक झाल्यानंतर घटनास्थळी आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रवाशांमध्येही घबराट पसरली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत जीवित हानी झाल्याचे वृत्त नव्हते. मात्र काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तिरुवल्लूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हैसूरहून दरभंगा मार्गे पेरम्बूरला जाणारी एक प्रवासी गाडी तिरुवल्लूरच्या जवळ कवारप्पेट्टीई रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका मालगाडीली धडकली. घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी दाखल झाले. तसेच मदतकार्यही सुरू करण्यात आले. एक्स्प्रेस गाडी तामिळनाडूच्या कावरपेट्टई येथे उभी असलेल्या गाडीला धडकली. या अपघातात अनेक जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR