19.3 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रदसरा मेळाव्यातून फुंकले रणशिंग

दसरा मेळाव्यातून फुंकले रणशिंग

शिंदे, ठाकरेंचे मुंबईत तर मुंडे, जरांगेंचे बीडमध्ये शक्तिप्रदर्शन, मेळाव्याला प्रचंड गर्दी

मुंबई/बीड : प्रतिनिधी
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच आज विजयादशमीच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांचा मुंबईत तर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा बीडमध्ये दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात शिवसेना ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन केले. दुसरीकडे मुंडे आणि जरांगे यांनीही ओबीसी, मराठा समाजाची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. हे शक्तिप्रदर्शन करतानाच या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यांकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून होते. बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला तर सावरगावात भगवानगडाच्या पायथ्याशी भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला. त्यानंतर सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्क आणि आझाद मैदानावर दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. यासोबतच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही जनतेशी संवाद साधला. यावेळी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढविला. पंकजा मुंडे यांनी आपल्या मेळाव्यात आता आपल्याला डाव खेळायचाय, असे म्हणत राज्यभर दौरे करणार असल्याचे सांगितले, तर मराठा समाजावर अन्याय झाल्याने आता उठाव करण्याची वेळ आल्याचे जरांगे पाटील म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतून कितीही आक्रमणे आली तरी त्यांच्या छातीत भगवा गाडून उभे राहण्याची तयारी असल्याचे म्हटले, तर ज्यांनी भगव्याचा रंग बदलला, त्यांचाच आम्ही रंग बदलून टाकल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या निमित्ताने राज्यात वाक्युद्ध पाहायला मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR