17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरदहा हजार झाडांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

दहा हजार झाडांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

लातूर : प्रतिनिधी
५ जून जागतिक पर्यावरण दिन. लातूर वृक्ष चळवळ, लातूर शहर मनपा व इतर सामाजिक संस्थांनी २०१६ मध्ये शहर परिसरात मुख्य रस्त्यावर लावलेल्या दहा हजार झाडांचा वाढदिवस साजरा केला. प्रतिनिधिक स्वरुपात औसा रोडवरील पिंपळाचा वाढदिवस  करण्यात आला. विविध उपक्रमांनी पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपण पण करण्यात आले. यावेळी मनपा सहायुक्त रामदास कोकरे, सह्याद्री देवराई व लातूर वृक्ष चळवळीचे समन्वयक सुपर्ण जगताप, स्टीम एज्युकेशनचे ओमप्रकाश झुरळे, डॉ. कल्याण बरमदे, मनपाचे सहआयुक्त्त मंजुषा गुरमे, पोलिस अधिकारी दयानंद पाटील, वर्शीप अर्थ फाउंडेशनचे आकाश सोनकांबळे, अ‍ॅड. बालाजी इंगळे, डॉ. बी. आर. पाटील, आम्ही मावळे शिवबाचे डॉ. निलम पन्हाळे-जाधव, अ‍ॅड. सुनील गायकवाड, राहूल लोंढे, भीम दुनगावे, लातूर वृक्षचे हेमंत रामढवे, कृष्णकुमार बांगड, आजम पठाण, मलाबार गोल्डचे आदम नजीर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गाधगिने, खाकी फाउंडेशनचे विवेक जगताप यांची उपस्थिती होती.
यावेळी या सर्व सहभागी ५ वर्ष वयाच्या मुलांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसोबत सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी  संवाद साधला. यावेळी उपस्थित सर्व चिमुकल्यांचे भावी पिढीचे आपण चांगल्या दृष्टीतून निसर्ग बघता  म्हणून खूप कौतुक केले. पर्यावरणावर सादर केलेली लहान शालेय मूलांची कलाकृतीपण त्यांनी पाहिली आणि त्यांना पर्यावरण दिनाचा निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. यानंतर सह्याद्री देवराई लातूरच्या महाविद्यालयीन मुलांनी वृक्षदिंडी काढत चांगभलं र चांगभलं वडाच्या नावानं चांगभलं घोषणा देत टाळ मृदंग वाजवत दिंडी काढली. शाळेतील  चिमुकल्यानी झाडे निसर्ग हवा जैवविविधता याविषयी संदेश देणारे फलक घेत वॉक फॉर क्लायमेट चेंजमध्ये सहभाग घेतला. औसा रोड परिसरात असलेल्या स्टीम एज्युकेशन या शाळेपासून दिंडी जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत आली काढली.
लातूर शहरातील झाडांचा आठवा वाढदिवस, जिल्हा क्रीडा संकुल येथे वृक्षारोपण तसेच औसा रोड येथे वृक्षारोपण, वृक्षदिंडी विविध नागरिकांनी, चिमुकल्यांनी  वातावरणातील  बदलाला कसे सामोरे जायचे याचे आवाहन करणारे फलक हातात धरुन खूप मोलाचा संदेश दिला. यानंतर संध्याकाळी महाविद्यालयीन तरुण-तरुणी सोबत पर्यावरण विषयक पुस्तकांचे वाचन वाचन कट्ट्यावर घेण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR