18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदिरानेच केली दोन्ही वहिनींची हत्या

दिरानेच केली दोन्ही वहिनींची हत्या

नगर येथे दिवसाढवळ्या हत्येचा थरार

नगर : प्रतिनिधी
अहमदनगरचा अकोले तालुका दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. अकोले तालुक्यातील बेलापूर गावात दिरानेच त्याच्या दोन भावजयींचा म्हणजेच वहिनींचा खून केला आहे. हत्येनंतर दीर घटनास्थळावरून फरार झाला आहे. आरोपीचे नाव दत्तात्रय प्रकाश फापाळे असे असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. तसेच, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. आरोपी माथेफिरू असल्याची माहिती समोर येत आहे.

अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावात ही घटना घडली आहे. जमिनीच्या आणि पैशाच्या किरकोळ वादातून दिराने दोन भावजयांचा निर्घृण खून केला आहे. भरवस्तीत दिवसाढवळ्या हा हत्येचा थरार घडला आहे. दोन्ही महिलांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले होते. धारदार कोयत्याच्या सहाय्याने दिराने दोन्ही वहिनींवर वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

उज्ज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे अशी दोन्ही मृत महिलांची नावे आहेत. भरवस्तीत खुनाचा थरार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीची आई फुलाबाई प्रकाश फापाळे यांच्या डोळ्यांसमोरच ही घटना घडली असून तिनेच पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिस आरोपीचा शोध घेत असून अकोले पोलिस तपास करत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR