18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयदिल्ली-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’ खराब; कॉन्ट्रॅक्टरला ५० लाखांचा दंड

दिल्ली-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’ खराब; कॉन्ट्रॅक्टरला ५० लाखांचा दंड

नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे खराब झाल्याने हा रस्ता बनवणा-या कॉन्ट्रॅक्टरला नितीन गडकरींच्या वाहतूक विभागानं ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर या महामार्गासंबंधीच्या काही अधिका-यांची देखील हकालपट्टी करण्यात आली आहे. पण गेली अनेक वर्षे रखडलेल्या आणि खड्ड्यांचे साम्राज्य बनलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाईसाठी नितीन गडकरी कोणाची वाट पाहत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिल्ली-मुंबई महामार्ग तयार करणा-या कॉन्ट्रॅक्टरला सदोष रस्ता बनवल्या प्रकरणी ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवरुन आपल्या निर्धारित वेगानं जाणा-या कारना रस्त्यात मध्येच उंचवटे निर्माण झाल्याने कसरत करत कार चालवावी लागते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनुसार या मार्गावरुन जाणा-या कार अक्षरश: हवेत उडाल्याची दृश्ये आहेत, परंतू हे अतिशय धोकादायक असून यामुळं यातून प्रवास करणा-यांच्या जीवाला मोठा धोका आहे. केवळ रस्त्याची पातळी एकसारखी नसल्यामुळे वाहन चालकांना भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR