21.2 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeराष्ट्रीयदिल्लीतील ६ मंदिरांवर वक्फ बोर्डाचा दावा

दिल्लीतील ६ मंदिरांवर वक्फ बोर्डाचा दावा

अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीमधील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने दावा ठोकल्याची माहिती समोर आली आहे. यामधील काही मंदिरं ही वक्फ बोर्डाची स्थापना होण्यापूर्वीची असल्याचे समोर आले आहे.

दिल्लीमधील ६ मंदिरांवर वक्फ बोर्डाने केलेल्या दाव्याची माहिती अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे. हा अहवाल २०१९ मध्ये समोर आला होता. यामध्ये केलेल्या दाव्यानुसार दिल्लीतील अनेक मंदिरे ही वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधलेली आहेत. या रिपोर्टमध्ये जे दावे करण्यात आले होते, त्यांना फॅक्ट फायंडिंग रिपोर्ट म्हणण्यात आले होते.

दरम्यान, सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार देशातील वक्फ मालमत्तेचा हिशेब करायचा झाल्यास २००६ मध्ये जिथे १.२ लाख एकर वक्फची संपत्ती होती. तर २००९ मध्ये हीच संपत्ती वाढून ४ लाख एकर एवढी झाली होती. हीच संपत्ती २०२४ मध्ये वाढून ९.४ लाख एकर एवढी झाली. दरम्यान, वक्फ बोर्डाबाबत तयार करण्यात आलेल्या जेपीसीने सर्वसामान्य जनतेकडून प्रतिक्रिया मागवल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत समितीला ९१ लाख ७८ हजार ४१९ ई-मेल प्राप्त झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR