मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला मुक्त करा, असे स्पष्ट करीत राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सागर बंगल्यावर भाजपसह मित्र पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांची गर्दी उसळली आहे. दरम्यान, फडणवीस यांची समजूत काढण्याच्या अनुषंगाने येथे बैठक सुरू झाली आहे.
मोदींना तोंडावर पाडलं: पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला त्याची कोणीतरी जबाबदारी घेणे आवश्यक होते. ती देवेंद्र फडणवीसांनी घेतली. कारण दिल्लीच्या नेतृत्वासमोर त्यांनी ४५ पेक्षा अधिक जागा मिळवणार असल्याचे चित्र निर्माण केले होते. देवेंद्र फडणवीसांनी जो आकडा दिला तो गृहीत धरुन मोदींनी ४०० पारची घोषणा केली. त्यानंतर मोदी तोंडघशी पडली. कोणीतरी त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. विधानसभेसाठी हा प्रयत्न आहे. पण त्यांचा राजीनामा स्विकारला जातो की नाही हे पाहावं लागेल. काहीतरी चुकल्याची त्यांना जाणीव झाली हे बरं झालं,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.