जळकोट : प्रतिनिधी
अनेक जण देव देवतांचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जातात ,किंवा मिळेल त्या वाहनाने प्रवास करत वारी करत असतात परंतु जळकोट तालुक्यातील धामणगाव येथील वीस तरुण एकत्र येत. सायकल चालवत तिरुपती येथे जाण्याचा निर्णय घेतला. ते राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ही यात्रा यशस्वी करणार आहेत. सलग ९ वर्षापासून हे युवक सायकलवर तिरूपतीला जातात .
यासोबतच त्यांनी एक टेम्पो घेतला असून या टेम्पोमध्ये ते सर्व साहित्य ठेवणार आहेत. ते दररोज १२५ किलोमीटरचे अंतर कापणार आहेत. सात ते आठ दिवसांमध्ये ते तिरुपती येथे पोहोचणार आहेत. धामणगाव येथील नामदेव राचमाळे ,गोपाळ कल्पले, प्रहलाद चट ,बाळासाहेब पाटील,अभय उदगीरे, गणेश कुलकर्णी,अण्णाराव मंदुमले, साईनाथ नलाबले, तेजस इंद्राळे, धीरज रेड्डी, शिवशंकर कानगुले यांचा समावेश या वारीमध्ये आहे. जळकोट तालुक्यातील धामणगाव येथून निघाल्यानंतर उदगीर , मैलार, बगल, महबूब नगर, बिचपल्ली, कृष्णा नदी, कर्नुल, तुंगभद्रा नदी, कडप्पा, राजमपेट, कोडूर, रेणुगुंठा करत ही सायकल स्वारी तिरुपतीला पोहोचणार आहे व श्री बालाजी दर्शन घेणार आहेत. यासोबतच प्रवासादरम्यान लागणा-या अनेक मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन करणार आहेत.