औसा : प्रतिनिधी
प्रत्येक राजकीय माणसांनी जर जीवनात असा धार्मिक संकल्प केला तर उद्याचा महाराष्ट्र आमच्यासाठी आदर्श राहील प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाही प्रत्येकाच्या नशिबात परमार्थ नाही. प्रत्येकाच्या नशीबात भगवंताचेचिंंतन नाही काहीतरी पूर्व जन्माचे पुण्य असल्याशिवाय कीर्तनाची अंत:करणात रुची निर्माण होत नाही. आमदार अभिमन्यू पवार यांनी नवीन वर्षाच्या नवीन पर्वाची सुरुवात एका आध्यात्मिक कार्यक्रमातून करण्याचा हा संकल्प आदर्शवत आहे, असे मत हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांनी व्यक्त केला आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटीव्ह फाऊंडेशनच्या पुढाकाराने (दि.१) जानेवारी रोजी औसा येथील उटगे मैदानावर नववर्षाच्या निमित्ताने आयोजित हरिकीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. हभप दतात्रय पवार, आमदार अभिमन्यू पवार, क्रिएटीव्ह फाऊंडेशनचे सचिव सुहास पाचपुते, डॉ उदय मोहिते, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, अॅड परिक्षीत पवार हे उपस्थित होते. हभप पुरूषोत्तम पाटील महाराज म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आदराने नाव घेतो याचे कारण राजे दिवसभर राज्य कारभार करायचे आणि सायंकाळी तुकोबारायांचे कीर्तन ऐकायचे आणि तुकोबारायांच्या कीर्तनाची ऊर्जा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभार केला म्हणून साडेचारशे वर्ष झाले तरीही शिवाजी महाराजांचे नाव अजरामर आहे. नवीन वर्षात पदार्पण करताना जुन्या वाईट सवयीचा त्याग केला पाहिजे. संप्रदायाने जेवढा आदर्श दिला तेवढा महाराष्ट्राला कोणीही दिला नाही, असे ते म्हणाले. यावेळी मोठयÞा संख्येने नागरिक उपस्थित होते.