नंदुरबार : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात नंदुरबारमध्येही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये अपहरण केलेल्या दोन मुलींवर दोन तरुणांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात असताना एका मुलीने जोरदार प्रतिकार करून स्वत:ची सुटका करून घेत पळ काढला. परंतु, त्यांच्या तावडीत सापडलेल्या दुस-या मुलीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
उपनगर पोलिसांनी यातील दोन्ही तरुणांना तातडीने अटक केली असून, न्यायालयाने ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ६ जानेवारी रोजी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजेपासून शनिवारी रात्री एक वाजेपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून घेणारी मुलगी १४ वर्षे वयाची आहे तर अत्याचाराला बळी पडलेली मुलगी १९ वर्षांची आहे. या दोन्ही मैत्रिणींना कोठली गावच्या आश्रमशाळेच्या गेटजवळ रोहित व सुनील नावाच्या दोन जणांनी गाठले.