28.1 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeनांदेडनांदेडात ढगफुटीसदृश पाऊस

नांदेडात ढगफुटीसदृश पाऊस

नांदेड : प्रतिनिधी
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने रात्री उशिरापर्यंत अक्षरश: झोडपून काढले. शहरातही जोरदार पाऊस झाला. नांदेडनजीक कवठा भागात शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून, येथे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने या भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, आजूबाजूला चिखल झाल्याने भाविकांची तारांबळ उडाली. दरम्यान, विष्णुपुरी धरणच्या पाणपोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणाचा एक दरवाजा सायंकाळी ५.३० च्या सुमारास उघडण्यात आला.

नांदेड शहरासह जिल्हाभरात पंधरा दिवसांपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली. यानंतर पावसाचा जोर कमी झाला तर आवठडाभरापासून पाऊस गायब झाला होता. दरम्यान, दिवसभर कडक ऊन होते. त्यानंतर रात्री उकाडा अशी स्थिती होती. त्यामुळे पाऊस गायब झाल्याचे चिंता वाढली होती. गेल्या दोन दिवसांपासून आभाळ भरून येत होते. परंतु पाऊस नव्हता. शुक्रवारी दुपारपर्यंत कडक ऊन होते. मात्र सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. काही वेळात ढगफुटीसदृश पाऊस झाला. पावसाने अक्षरश: झोडपून काढले. रात्रीच्या वेळी जिल्ह्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. आधीच शंकरराव चव्हाण विष्णुपुरी धरण दि. २३ रोजी ९८ टक्के क्षमतेने भरले. त्यातच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे विष्णुपुरी धरणाचा एक दरवाजा सायंकाळी ५.३० वाजता उघडण्यात आला असून, ४६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR