22.2 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्रनागपुरात भरधाव कारने ९ जणांना चिरडले ;दोघांचा मृत्यू

नागपुरात भरधाव कारने ९ जणांना चिरडले ;दोघांचा मृत्यू

नागपूर : प्रतिनिधी
नागपूर पुन्हा एकदा अपघाताने हादरले असून दिघोरी नाक्याजवळ हिट अँड रनची घटना घडलीय. मध्यरात्री रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील चिरडल्याचे समोर आले आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर ९ जण झोपले होते. अपघाताचे प्रमाण वाढल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रंक अँड ड्राइव्हची मोहिम तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत.

दिघोरी नाक्याजवळ फुटपाथवर एकाच कुटुंबातील ९ जण झोपले होते. यात चार महिला, पुरुष आणि लहान मुले होते. यापैकी महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी कारमध्ये पाच जण होते. कारमधील सर्वजण दारु पिऊन असल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी पाच जणांना अटक केलीय. यापैकी भूषण लांजेवार हा कार चालवत असल्याची माहिती समजते.

मध्यरात्री नागपुरात कारचालकाने फूटपाथवर मजुरांना चिरडण्याची घटना घडली. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा होईल, हे सुनिश्चित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. रात्रीची गस्त वाढवून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची मोहीम तीव्र करावी, असेही त्यांनी पोलिस प्रशासनाला सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR