31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरनिलंगा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवा

निलंगा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवा

निलंगा : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीकरिता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागून निलंगा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवावा, असे आवाहन पक्ष निरीक्षक मध्यप्रदेशचे आमदार कुणाल चौधरी यांनी केले.
    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीकरिता निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचा बुथ मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, प्रदेश सचिव अभय साळुंके, जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, संतोष देशमुख , माजी प.स सभापती अजित माने, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ अरंिवंद भातांब्रे, अल्पसंख्याक सेलचे निलंगा तालुकाध्यक्ष लाला पटेल, दिलीप पाटील नागराळकर, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरुर-अनंतपाळचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर,देवणीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड अजित बेळकुणे, औरादचे माजी सरपंच मोहनराव भंडारे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, पंकज शेळके, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, अ‍ॅड नारायण सोमवंशी, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, गजानन भोपनीकर, निलंगा महिला तालुकाध्यक्ष सौ  आरती भंडारे, अजित ंिनबाळकर, निलंगा युवक काँग्रेसचे  तालुकाध्यक्ष मदन बिरादार, नगरसेवक सुधीर लखनगावे, सुरेंद्र धुमाळ, अशोक कोरे हे  मान्यवर उपस्थित होते.
        प्रथमत: स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व स्व विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि स्व दयानंद चोपणे यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करीत श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चक्रधर शेळके यांनी केले तर आभार प्रा डॉ गजेंद्र तरंगे यांनी मानले. यावेळी मुजीब सौदागर, गंगाधर चव्हाण, गोंिवंद सूर्यवंशी, विकास पाटील, तानाजी डोके, माधवराव पाटील, सिराज देशमुख, अनिल अग्रवाल, रमेश मोगरगे, गिरीश पात्रे, तुराब बागवान, व्यंकटराव शिंंदे, युसूफ शेख, माधवराव धुमाळ, दिलीप ढोबळे, दिनकर बिराजदार, अशोक शेटकार, विठ्ठल पाटील, अभिजित उसनाळे, प्रसाद झरकर, धनाजी चांदुरे, ज्ञानेश्वर ंिपंड, बालाजी वळसांगवीकर अदीसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR