निलंगा : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून निलंगा मतदारसंघातील साठ हजार महिलांचे अर्ज मंजूर झाल्याची माहिती अरंिवंद पाटील निलंगेकर यांनी दिली. दि ८ ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अरंिवंद पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली . यावेळी अरंिवंद पाटील निलंगेकर म्हणाले की , या योजनेपासून निलंगा मतदारसंघातील १८ ते ६५ वयातील एकही महिला वंचित राहणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. प्रत्येक गाव व वस्ती तांड्यानिहाय याद्या काढून एकही महिला वंचित राहणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
गेल्या महिनाभरापासून या योजनेसाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून निलंगा मतदारसंघांमध्ये एकूण ६५ हजार महिलांनी या योजनेत आपले अर्ज सादर केले असून यामधील ६० हजार महिलांचे अर्ज पात्र झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून माझी लाडकी बहीण या योजनेसाठी भरण्यात आलेल्या अर्जाची छाननी मंजुरी पात्र अपात्र असे वर्गीकरण करण्यात येत असल्याने हे डाऊन झाले होते परंतु हे सर्वर पुन्हा सुरळीत सर्वर चालेल अशी माहिती बैठकीस उपस्थित असलेले निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी दिली.
ऑनलाईन अर्ज मोठ्या संख्येने करण्यात आल्याने यासाठी प्रशासनाचे कौतुक करीत १८ ते ६५ वयोगटातील निलंगा मतदारसंघातील एकूण संख्या काढा गावनिहाय याद्या तयार केल्यानंतर या योजनेपासून किती महिला वंचित आहेत हे चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळे निलंगा मतदारसंघातील १०० टक्के भरण्यात आलेले अर्ज निकाली काढावेत. निलंगा मतदारसंघातील कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला निलंगेकर यांनी दिल्या. अर्ज मंजूर असलेल्या महिलांच्या खात्यावरती १८ ते १९ ऑगस्ट रोजी पैसे पडतील असेही ते यावेळी म्हणाले.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सोपान अकेले, मुख्याधिकारी गजानन शिंंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी बालाजी कोरे, निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे गटनेते रोहित पाटील तसेच निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी येथील तहसीलदारांसह सर्व कार्यालयीन विभाग प्रमुख उपस्थित होते.