अहिल्यानगर : प्रतिनिधी
राज्यात महायुती सरकार आल्यावर मला ऊसतोडणी महामंडळ मिळाले की तुमच्यावर काही मागायची वेळ येणार नाही, असे सांगत भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी महामंडळासंबंधीचीही इच्छा बोलून दाखविली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पाथर्डीत भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच पंकजा मुंडे यांनी मोठी इच्छा व्यक्त केली आहे. आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटले की, महायुती सरकारने तुमच्या लेकीवर मोठी जबाबदारी दिलीय. पार्टीने तिकिटं वाटली पण निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे सरकार बनवताना तुमच्या या मुलीचा सिंहाचा वाटा असेल. तुम्ही माझ्यासोबत आमदारांना पाठवा. राज्यातील साखर कारखाने अद्याप व्यवस्थित सुरू झालेले नाहीत. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांनी आधी मतदान करावे त्यानंतरच ऊस तोडणीच्या कामाला जावे असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले.
राज्यात महायुती सरकार आल्यावर मला ऊसतोडणी महामंडळ मिळाले की तुमच्यावर काही मागायची वेळ येणार नाही, असे सांगत भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी महामंडळासंबंधीचीही इच्छा बोलून दाखविली आहे. मतदान करा आणि मगच जा यासाठीच मी कोयत्याला धार लावून ठेवा असे बोलले होते. मात्र त्याचा अर्थ काही जणांनी वेगळा लावला. या मतदारसंघात ऊस तोडणी कामगारांची संख्या जास्त आहे. या मतदारसंघात ऊस तोडणी कामगारांना मुंडे यांनी साद घालत महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.