18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeपक्षांतर्गत नाराजीमुळे भुजबळांना वगळले!

पक्षांतर्गत नाराजीमुळे भुजबळांना वगळले!

नागपूर : वृत्तसंस्था
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. मात्र महायुती सरकारच्या झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळांना वगळण्यात आलं. दरम्यान, छगन भुजबळांना मंत्रिपदापासून डावलण्यात आल्याची अनेक कारणं समोर आली आहे. पक्षांतर्गत नाराजीमुळे छगन भुजबळ मंत्रिपदापासून दूर असल्याची माहिती आहे. यासंदर्भातील कारणं समोर आली आहेत. तर निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केल्याने पक्षातील लोकांची छगन भुजबळ यांच्यावर नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

छगन भुजबळांनी बळजबरीने मुलगा पंकज भुजबळ यांच्यासाठी विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतली, त्यामुळे नाराजी पाहायला मिळते. दरम्यान, छगन भुजबळांनी आपल्या मुलासाठी केलेलं कृत्य पक्षातील वरिष्ठांना आवडलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासोबतच पुतण्या समीर भुजबळ यांनी महायुतीविरोधात अपक्ष अर्ज भरल्यानंही रोष व्यक्त होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नाशकातील सर्व आमदारांनी छगन भुजबळांना मंत्रिपद देऊ नका, अशी अजितदादांकडे विनंती केली. जर छगन भुजबळांना मंत्रिपद दिल्यास नाशकातील सर्व आमदार राजीनामा देतील, असा इशारा पदाधिका-यांनी दिला होता, अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR